दिवस संपतो… आणि आतून वाटतं — आज काहीच केलं नाही. असे वाटते का तुम्हाला ?
संपूर्ण दिवस कामात गेला…पण रात्री स्वतःला विचारलं की,
आज खरंच काही meaningful केलं का?
तर उत्तर सापडत नाही.
हे फक्त तुमच्याच बाबतीत नाही…
ही आजच्या अनेक लोकांची reality आहे.
आपण दिवस सुरू करतो… पण दिशा नसते. नक्की काय काम करायचं हे ठरलेले नसते. कामं करतो… पण clarity नसते. आणि मग हळूहळू दिवस, आठवडे, वर्षं निघून जातात.
समस्या एकच आहे, Purpose ची कमतरता.
- purpose नसला की दिवस असाच निघून जातो
जेव्हा तुम्हाला माहित नसतं की आज का उठायचं आहे, तेव्हा दिवस आपोआप random गोष्टींमध्ये जातो.
लक्षात ठेवा ,
प्रत्येक दिवस ही एक संधी आहे जी परत येत नाही. - वेळ वाया घालवणं म्हणजे आयुष्य वाया घालवणं
आपण time pass करतो…पण खरं तर “life pass” होत असते.
जीवन = वेळ
म्हणूनच वेळ वाया घालवणं म्हणजे आयुष्य वाया घालवणं.
Busy राहणं उपयोगाचं नाही, Intentional राहणं महत्त्वाचं आहे. - Action आधी, feeling नंतर
आपण ठरवतो, “मूड आला की काम करेन…”
पण truth असं आहे
मूड येत नाही, तो तयार करावा लागतो.
Action घेतल्यावरच clarity आणि confidence येतो. - Intentions तुमची energy ठरवतात
सकाळी उठून जर तुम्हाला हे क्लिअर असेल कि, आज मी हे करणार आहे, आणि का करणार आहे
तर तुमच्या दिवसाची energy change होऊन जाते.
Purpose + Clarity = Energy - Self-confidence कसा वाढतो?
खूप लोक confidence शोधतात…पण तो build होतो एका साध्या गोष्टीने
“स्वतःला दिलेल्या वचनांचं पालन केल्याने.”
वचन मोडलं तर trust कमी होतो,
वचन पाळलं तर confidence वाढतो. - एक छोटा पण powerful ritual
दररोज सकाळी स्वतःला विचारा
“आज मी काय करणार आहे जे खरंच महत्त्वाचं आहे?”
आणि मग ते पूर्ण करा.
आजपासून बदल सुरू करा
उद्या नाही… आजच.
✔️ सकाळी 5 मिनिटे स्वतःसोबत बसा
✔️ आजचा स्पष्ट उद्देश लिहा
✔️ एक महत्त्वाचं काम ठरवा
✔️ आणि ते पूर्ण होईपर्यंत थांबू नका
Morning Rituals मध्ये आपण “10 Habits That Will Rewire Your Mindset” या पुस्तकावर चर्चा करत आहोत, त्यातील insights वर आधारित हा लेख आहे.
रोजच्या Rituals मध्ये सहभागी व्हा
https://chat.whatsapp.com/KqCgPZzskA8KGlsWqWvG3M
आणि mindset बदलण्याची ही series experience करा.



