हरवलेले संवाद : आपल्याकडून अपेक्षित असलेला एक कॉल किंवा मेसेज

आपण आपल्या कामामध्ये इतके गुंतलेले असतो की वेळेचे भान राहत नाही. goals पूर्ण करणे, जबाबदाऱ्या पार पाडणे, प्रगतीच्या मार्गावर पुढे जाणे या सगळ्या गोष्टींत आपण पूर्णपणे व्यस्त असतो. यामध्ये काहीच चुकीचे नाही – कारण काम, goals आणि जबाबदाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनाचा भाग आहेत.
पण या सगळ्या धावपळीत नकळत काही गोष्टी मागे पडतात त्यापैकी एक म्हणजे नात्यांची सांभाळणं. काही लोक आपल्या आयुष्यात असे असतात ज्यांना आपल्याकडून एक साधा मेसेज “कसा आहेस? किंवा कशी आहेस ? ” हा मेसेज, किंवा २ मिनिटांचा फोन कॉल सुद्धा मोठा आधार वाटतो. कदाचित ते काही बोलणार नाहीत, पण मनात असते की “या व्यक्तीकडून कॉल किंवा मेसेज यावा”.
आपल्याला त्यांच्या अपेक्षा जाणवत नाहीत, कारण आपण सतत पुढे चाललोय. पण नात्यांना जपायचे असेल तर मागे वळून पाहावे लागते – थोडं थांबून, त्यांची विचारपूस करावी लागते.

तुम्ही व्यस्त आहेत याचा त्यांना अभिमान आहे, पण…
हो, ते तुमच्यावर प्रेम करतात, तुमच्या मेहनतीचा, तुमच्या कर्तृत्वाचा त्यांना अभिमान आहे. पण त्याचबरोबर त्यांच्या मनात एक छोटी आशा असते की कधीतरी तुम्ही एक फोन कराल, एक छोटा मेसेज कराल, “बोलू या का थोडा वेळ?” असं विचाराल.
आपल्या आयुष्यात करिअर, ऑफीसचे काम हे महत्वाचे असले तरी त्यात माणसांच्या संवेदना आणि आपुलकी जपणं हेही तितकंच आवश्यक आहे.

काही क्षण देणं म्हणजे वेळ वाया घालवणं नाही :
जसे काम आणि जबाबदाऱ्या महत्वाच्या आहेत, तसे प्रेम, काळजी आणि नातेसंबंध हेसुद्धा महत्त्वाचे असतात. तुमच्या एका मेसेजमुळे एखाद्या माणसाच्या चेहऱ्यावर उमललेलं हसू, तुमच्या एका कॉलमुळे भरून आलेले डोळे –याची किंमत कशातच करता येत नाही. एक कॉल करून त्यांच्यासोबत ५ मिन बोलून बघा तुमचा कामाचा थकवा, स्ट्रेस सगळं पळून जाईल आणि त्याचबरोबर समोरच्या व्यक्तीच्या नजरेत तुमची value देखील वाढेल.

आता तुमचा प्रश्न असेल….
यासाठी आम्ही नक्की काय करावं?

  • आठवड्यातून एकदा, थोडा वेळ बाजूला काढा – फक्त “कॉल करण्यासाठी”.
  • ज्या व्यक्तीची आठवण येते, त्याला लगेच एक छोटा मेसेज करा – “आठवण येतेय तुला वेळ असेल तर बोलूया का”?
  • स्वतःच्या आयुष्यातून थोडा वेळ काढून, त्यांच्या आयुष्यात तुमची “उपस्थिती” दाखवा.

शेवटी…
आपण जे निर्माण करतो त्याला महत्व असावं, पण आपण ज्या नात्यांमध्ये गुंतलेले आहोत त्यामागेही आपुलकी असावी. कामाच्या व्यापात असूनही कुणीतरी वाट पाहतंय, हे ओळखणं म्हणजे आपण भावनिकदृष्ट्या प्रगल्भ झालो आहोत याची खूण आहे.

आपण प्रगतीच्या दिशेने जाताना, थोडंसं मागं पाहिलं तर कदाचित कुणाचं मन जिंकलं जाईल आणि आपलं मन अधिक समृद्ध होईल.

Amruta More

Software Engineer
Co-Founder of Shashwatswarajya
Director of OPRA IT Solutions Pvt.Ltd

उद्योजकता, तंत्रज्ञान, नेतृत्व, सेल्फ डेव्हलपमेंट आणि आयुष्यात सकारात्मक बदल घडवणाऱ्या विषयांवर मी नियमितपणे लिहिते. माझ्या लेखांमधून तुम्हाला नवीन दृष्टिकोन, कृतीत आणता येतील अशा कल्पना आणि प्रगतीसाठी प्रेरणा मिळावी, हा माझा प्रयत्न असतो.

Edit Template

About

उद्योजकता, तंत्रज्ञान, नेतृत्व, सेल्फ डेव्हलपमेंट आणि आयुष्यात सकारात्मक बदल घडवणाऱ्या विषयांवर मी नियमितपणे लिहिते. माझ्या लेखांमधून तुम्हाला नवीन दृष्टिकोन, कृतीत आणता येतील अशा कल्पना आणि प्रगतीसाठी प्रेरणा मिळावी, हा माझा प्रयत्न असतो.

Pages

© 2026 Created with techsavvyamruta