“विचारांच्या जाळ्यात अडकलेलं मन आणि Mental Detox”

सगळ्यात जास्त थकवा कामामुळे येत नाही…तो येतो आपल्या डोक्यात सतत चालणाऱ्या विचारांच्या आवाजामुळे.
एकदा शांत बसून बघा… तुमच्या आयुष्यातील अर्ध्याहून जास्त समस्या प्रत्यक्षात नसतातच. त्या आपल्या मनाने तयार केलेल्या असतात.
“लोकं माझ्याबद्दल काय विचार करत असतील ?”
“मी फेल झालो तर?”
“माझ्याकडून हे नाही झालं तर?”
“बाकीचे लोक माझ्यापेक्षा पुढे गेले…”
हे विचार हळूहळू इतके मनात घर करतात, की आपल्याला तेच वास्तव वाटायला लागतं. पण खरी गोष्ट काय आहे माहितीये?
प्रत्येक विचार हा सत्य नसतो.
आजकाल आपण सतत information overload मध्ये जगतोय. Social media वर प्रत्येकजण perfect life दाखवतो. कुणी foreign trip वर, कुणी luxury car मध्ये, कुणी business success celebrate करताना दिसतो… आणि नकळत आपण स्वतःची तुलना करू करतो.
एक साधे उदाहरण:
एका व्यक्तीने WhatsApp वर message केला. समोरून reply यायला २ तास लागले. बस… इथून आपल्या मनाचा cinema सुरू होतो.
“कदाचित तो माझ्यावर रागावला असेल…”
“मी काही चुकीचं बोललो का?”
“त्याला माझी value नाही का?”
आणि नंतर कळतं… समोरचा माणूस फक्त busy होता. म्हणजे घटना छोटी होती…
पण आपल्या विचारांनी तिचं संकट बनवलं. हेच आहे overthinking. आपण अनेकदा पुढचा विचार करून वर्तमान खराब करतो. मन सतत worst-case scenario तयार करत राहतं. आणि मग anxiety, stress, self-doubt हळूहळू आयुष्याचा भाग बनतात. म्हणूनच मन detox करण्याची गरज जास्त आहे. जसं आपण unhealthy food टाळतो… तसंच unhealthy thoughts पण ओळखायला शिकायला हवं. ते टाळायला हवेत. काही विचार फक्त temporary emotions असतात. ते कायमचं सत्य नसतात.
कधी कधी थोडं शांत बसून स्वतःला विचारायचं…“हा विचार खरंच सत्य आहे का? की माझं मन मला घाबरवतंय?” कारण शांत मनाने घेतलेले निर्णय आयुष्य बदलतात.
एक entrepreneur business सुरू करतो तेव्हा सुरुवातीला त्यालाही भीती असते. “Client मिळाले नाहीत तर?”, “Loss झाला तर?”, “लोक हसले तर?” पण जे लोक या विचारांच्या पलीकडे action घेतात… तेच पुढे जाऊन successful होतात.

आपल्या मनाला रोज garbage मिळत असेल… तर confidence कसा वाढणार?
म्हणून काही गोष्टी consciously करुया:

  • Negative content कमी बघू
    • स्वतःची तुलना करणे कमी करू
    • स्वतःला शांत वेळ देऊ
    • Journaling करूया
    • Nature मध्ये वेळ घालवूया
    • आणि सर्वात महत्त्वाचं… स्वतःशी प्रेमाने बोलूया
    कारण आपण स्वतःशी जसं बोलतो… तसंच आयुष्य घडायला लागतं. मन शांत असेल तर परिस्थिती अवघड असली तरी मार्ग सापडतो. पण मनच गोंधळलेलं असेल… तर छोटी गोष्टही मोठं संकट वाटतं.
    आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा…
    तुमचे विचार म्हणजे तुम्ही नाही. तुम्ही त्या विचारांपेक्षा खूप मोठे आहात.

जर हा लेख तुम्हाला relate झाला असेल, तर comment मध्ये “Detox” लिहा.
आणि हा लेख त्या व्यक्तीला नक्की share करा… जी सध्या overthinking मुळे स्वतःलाच हरवत आहे.

-अमृता मोरे

Amruta More

Software Engineer
Co-Founder of Shashwatswarajya
Director of OPRA IT Solutions Pvt.Ltd

उद्योजकता, तंत्रज्ञान, नेतृत्व, सेल्फ डेव्हलपमेंट आणि आयुष्यात सकारात्मक बदल घडवणाऱ्या विषयांवर मी नियमितपणे लिहिते. माझ्या लेखांमधून तुम्हाला नवीन दृष्टिकोन, कृतीत आणता येतील अशा कल्पना आणि प्रगतीसाठी प्रेरणा मिळावी, हा माझा प्रयत्न असतो.

Edit Template

About

उद्योजकता, तंत्रज्ञान, नेतृत्व, सेल्फ डेव्हलपमेंट आणि आयुष्यात सकारात्मक बदल घडवणाऱ्या विषयांवर मी नियमितपणे लिहिते. माझ्या लेखांमधून तुम्हाला नवीन दृष्टिकोन, कृतीत आणता येतील अशा कल्पना आणि प्रगतीसाठी प्रेरणा मिळावी, हा माझा प्रयत्न असतो.

Pages

© 2026 Created with techsavvyamruta