“निवडीचा प्रभाव : तुम्ही सोन्यासारख चमकणार की गंजणार ?”

“तुमच्या आयुष्यात सध्या कोणाचा संपर्क जास्त आहे… परिस की गंज?”
हा प्रश्न थोडा विचित्र वाटेल… पण जरा शांतपणे विचार करा.
कारण माणूस ज्या गोष्टींच्या, ज्या लोकांच्या आणि ज्या विचारांच्या सहवासात राहतो… तसाच तो हळूहळू बनत जातो. लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला की ते सोनं बनतं…आणि तेच लोखंड सतत ओलीत राहिले तर त्यावर गंज चढतो.
आपलं आयुष्यही अगदी असंच आहे. फरक एवढाच…आपल्याला रोज निवड करण्याची संधी असते.

कधी लक्ष दिलंय का?
काही लोकांशी फक्त १० मिनिटं बोललं तरी मन प्रसन्न होतं. नवीन ऊर्जा मिळते. स्वतःवर विश्वास वाढतो. आणि काही लोक भेटले की नकळत थकवा येतो. नकारात्मकता वाढते. आपण काहीच करू शकत नाही असं वाटायला लागतं. हे फक्त लोकांबाबत नाही…आपण काय पाहतो, काय ऐकतो, सोशल मीडियावर काय consume करतो, स्वतःशी कसं बोलतो… याचाही आपल्या मनावर खोल परिणाम होत असतो. आजच्या काळात हे खूप real आहे. मी आधी अशा वातावरणात राहायचे जिथे friends फक्त तक्रारी करायचे.
“पुढे काही होणार नाही…”
“Business मध्ये काही future नाही…”
“हे चांगले नाही, ते चांगले नाही …” असे बोलायचे.

हळूहळू माझाही आत्मविश्वास कमी झाला. नंतर मी environment बदललं. अशा लोकांमध्ये राहू लागले जे शिकत होते, प्रयत्न करत आहेत , अपयशातून पुन्हा उभे राहत आहेत. एका वर्षात माझे विचार बदलले … काम बदललं… आणि आयुष्याची दिशा पण.
परिस नेहमी एखादी व्यक्तीच असेल असं नाही…
कधी एखादं पुस्तक, कधी एखादा mentor, कधी एखादा अनुभव, तर कधी एखादी कठीण परिस्थितीही आपल्याला सोन्यासारखं घडवते. पण एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे… सोनं बनवणारे परिस कायम सोबत राहत नाही. Teacher कायम हात धरून चालवत नाही. Motivation रोज बाहेरून मिळत नाही. एक दिवस स्वतःलाच स्वतःचा आधार बनावं लागतं आणि तिथून खरी growth सुरू होते. त्याचवेळी…नकारात्मक विचार, सततची तुलना, स्वतःबद्दलची कमी भावना… हे हळूहळू गंज चढल्यासारखे आपलं अस्तित्व खाऊ लागतात.

गंज एकदम लागत नाही… तो थोडा थोडा वाढत जातो. म्हणूनच आयुष्यात वेळोवेळी स्वतःला विचारायला हवं:
मी कोणत्या वातावरणात राहतोय?
माझे विचार मला घडवत आहेत की तोडत आहेत?
मी रोज स्वतःला मजबूत करत आहे की आतून कमजोर?
कारण शेवटी…
आपलं भविष्य एका मोठ्या निर्णयाने बदलत नाही. ते रोजच्या छोट्या निवडींनी घडतं.
कोणाला ऐकायचं…
कोणासोबत राहायचं…
काय शिकायचं…
कशावर विश्वास ठेवायचा… आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे,
स्वतःला कसं पाहायचं. तुमच्या आयुष्यातही असा एखादा “परिस” आहे का ज्याने तुम्हाला घडवलं?
किंवा एखादा अनुभव ज्याने तुमचं आयुष्य बदललं?

Comment मध्ये नक्की share करा.
कदाचित तुमचा अनुभव कोणासाठी तरी प्रेरणा ठरेल. ✨

-अमृता मोरे

Amruta More

Software Engineer
Co-Founder of Shashwatswarajya
Director of OPRA IT Solutions Pvt.Ltd

उद्योजकता, तंत्रज्ञान, नेतृत्व, सेल्फ डेव्हलपमेंट आणि आयुष्यात सकारात्मक बदल घडवणाऱ्या विषयांवर मी नियमितपणे लिहिते. माझ्या लेखांमधून तुम्हाला नवीन दृष्टिकोन, कृतीत आणता येतील अशा कल्पना आणि प्रगतीसाठी प्रेरणा मिळावी, हा माझा प्रयत्न असतो.

Edit Template

About

उद्योजकता, तंत्रज्ञान, नेतृत्व, सेल्फ डेव्हलपमेंट आणि आयुष्यात सकारात्मक बदल घडवणाऱ्या विषयांवर मी नियमितपणे लिहिते. माझ्या लेखांमधून तुम्हाला नवीन दृष्टिकोन, कृतीत आणता येतील अशा कल्पना आणि प्रगतीसाठी प्रेरणा मिळावी, हा माझा प्रयत्न असतो.

Pages

© 2026 Created with techsavvyamruta