तुमचा सर्वात मोठा शत्रू तुमच्या मनातच लपलाय!

तुमचा सर्वात मोठा शत्रू तुमच्या मनातच लपलाय!
कल्पना करा…
तुमचा एखादा जवळचा मित्र चूक करतो किंवा अडचणीत असेल तर
तुम्ही त्याला म्हणाल का: “तू काही कामाचा नाहीस”, “तुझ्याकडून काही होणार नाही”.
नाही ना?
उलट, तुम्ही त्याला समजावाल, धीर द्याल, त्याच्यावर विश्वास दाखवाल. पण जेव्हा स्वतःची वेळ येते तेव्हा आपण स्वतःशी कसं बोलतो?
“माझ्याकडून होत नाही”, “मी काही खास नाही”
इथेच खरा प्रॉब्लेम सुरू होतो.

तुमचा स्वसंवाद तुमचं भविष्य ठरवतो
दिवसभरात आपल्या मनात हजारो विचार येतात. त्यातला मोठा भाग हा आपण स्वतःशी बोलत असतो.
आणि हळूहळू हे विचारच आपली ओळख (identity) बनतात.
तुम्ही स्वतःबद्दल जे वारंवार म्हणता, तेच तुमचं future बनतं.

आपण नकळत स्वतःला negative tags लावतो:
“मी consistent राहू शकत नाही”
“मी disciplined नाही”
“माझ्याकडून business होत नाही”
“मी बोलण्यात weak आहे”
“लोक मला seriously घेत नाहीत”
ही वाक्यं फक्त thoughts नाहीत. ती तुमच्या मेंदूसाठी instructions असतात.

जग तुमच्याकडे तसं पाहतं, जसं तुम्ही स्वतःकडे पाहता.

असं का होतं?
मानवी मनाची एक tendency आहे ते negative गोष्टी जास्त लक्षात ठेवतं. म्हणूनच, एक छोटा negative thought हळूहळू strong belief बनतो. आणि ऐन वेळी तो तुमची action थांबवतो.

हे बदलायचं कसं?

  1. जाणीवपूर्वक बदल करा
    तुमच्या मनात negative thought आला की, तो लगेच पकडा आणि reframe करा.
    उदा. “मी consistent राहू शकत नाही” याला खालीलप्रमाणे reframe करा.
    ✅ मी रोज थोडं का होईना, पण सातत्याने पुढे जातोय .
  2. स्वतःशी तसंच बोला, जसं तुम्ही आदर करत असलेल्या व्यक्तीशी बोलता
    Respect, patience आणि encouragement… हे स्वतःलाही द्या.
  3. स्वतःची छोटी achievements celebrate करा
    तुम्ही जे करत आहात, ते recognize करा. कारण जे दिसतं, तेच वाढतं.

तुमचं आंतरिक जगच तुमचं बाह्य जग तयार करतं.
जर तुम्हाला आयुष्य बदलायचं असेल, तर सुरुवात एका छोट्या गोष्टीने करा:
स्वतःसोबतचा संवाद बदला.

आज दिवसभरात स्वतःबद्दल एकही negative शब्द बोलू नका. आणि रात्री झोपण्यापूर्वी स्वतःच्या एका चांगल्या गोष्टीसाठी स्वतःचे आभार माना.

तुम्ही आज स्वतःला कोणता positive tag देणार आहात?
कमेंटमध्ये नक्की सांगा.

Amruta More

Software Engineer
Co-Founder of Shashwatswarajya
Director of OPRA IT Solutions Pvt.Ltd

उद्योजकता, तंत्रज्ञान, नेतृत्व, सेल्फ डेव्हलपमेंट आणि आयुष्यात सकारात्मक बदल घडवणाऱ्या विषयांवर मी नियमितपणे लिहिते. माझ्या लेखांमधून तुम्हाला नवीन दृष्टिकोन, कृतीत आणता येतील अशा कल्पना आणि प्रगतीसाठी प्रेरणा मिळावी, हा माझा प्रयत्न असतो.

Edit Template

About

उद्योजकता, तंत्रज्ञान, नेतृत्व, सेल्फ डेव्हलपमेंट आणि आयुष्यात सकारात्मक बदल घडवणाऱ्या विषयांवर मी नियमितपणे लिहिते. माझ्या लेखांमधून तुम्हाला नवीन दृष्टिकोन, कृतीत आणता येतील अशा कल्पना आणि प्रगतीसाठी प्रेरणा मिळावी, हा माझा प्रयत्न असतो.

Pages

© 2026 Created with techsavvyamruta