खरं तर एकटेपणा एकटं असल्यामुळे नाही… तर समजून घेणारं माणूस नसल्यामुळे वाटतो.

“आता जास्त बोलावंसं वाटत नाही…”

पूर्वी आपण सगळं मनातलं लगेच बोलायचो…

 काय वाटतंय, काय त्रास होतोय, कोणत्या गोष्टी मनाला लागल्या, अगदी सगळं. कारण तेव्हा वाटायचं…“आपलं माणूस आहे, समजून घेईल.”

पण जसजसं आयुष्य पुढे जातं ना, तसतसं एक गोष्ट लक्षात यायला लागते, प्रत्येकाला आपली भावना समजेलच असं नसतं.

कधी आपण मन मोकळं करतो…आणि समोरच्याला त्याचं काहीच वाटत नाही. कधी आपण अपेक्षा ठेवतो…आणि समोरचा अगदी सहज ignore करून पुढे निघून जातो.

तेव्हा फक्त बोलणं मनाला लागत नाही…दुखावते ती “समजून घेतलं जाईल” ही अपेक्षा. मग हळूहळू माणूस बदलायला लागतो. पूर्वीसारखा प्रत्येक गोष्टीवर react करत नाही. वाद घालायची इच्छा राहत नाही. प्रत्येकाला explain करावंसं वाटत नाही. कारण काही वेळा शांत राहणं हेच स्वतःला जपणं  असतं.

आजकाल खूप लोक बाहेरून normal दिसतात… हसतात, काम करतात, लोकांमध्ये मिसळतात…

पण आतून मात्र खूप थकलेले असतात. त्यांना attention नको असतं…फक्त कुणीतरी खरंच ऐकणारं माणूस हवं असतं.

आणि खरं सांगायचं तर…मोठं झाल्यावर loneliness लोकांच्या absence मुळे येत नाही … तर “आपल्याला खरंच समजून घेणारं कोणी नाही” या feeling मुळे येतं. म्हणून आता अनेक लोक कमी बोलतात. तो attitude नसतो… ते अनुभव असतात.

काही जखमा वेळ भरून काढते…पण काही जखमा माणसाला शांत राहायला शिकवतात.

आता प्रत्येक गोष्टीचं उत्तर द्यायचं नसतं…प्रत्येक वेळी स्वतःला prove करायचं नसतं…आणि प्रत्येक नातं टिकवण्यासाठी स्वतःला तोडायचंही नसतं.

कधी कधी फक्त शांत राहायचं…स्वतःला सावरायचं…आणि आयुष्यात जे खरंच आपलं आहे त्यालाच वेळ द्यायचा.

कारण शेवटी…मन थकलेलं असते तेव्हा मोठ्या सल्ल्यांपेक्षा, एक शांत साथ जास्त healing देऊन जाते.

– अमृता मोरे

Amruta More

Software Engineer
Co-Founder of Shashwatswarajya
Director of OPRA IT Solutions Pvt.Ltd

उद्योजकता, तंत्रज्ञान, नेतृत्व, सेल्फ डेव्हलपमेंट आणि आयुष्यात सकारात्मक बदल घडवणाऱ्या विषयांवर मी नियमितपणे लिहिते. माझ्या लेखांमधून तुम्हाला नवीन दृष्टिकोन, कृतीत आणता येतील अशा कल्पना आणि प्रगतीसाठी प्रेरणा मिळावी, हा माझा प्रयत्न असतो.

Edit Template

About

उद्योजकता, तंत्रज्ञान, नेतृत्व, सेल्फ डेव्हलपमेंट आणि आयुष्यात सकारात्मक बदल घडवणाऱ्या विषयांवर मी नियमितपणे लिहिते. माझ्या लेखांमधून तुम्हाला नवीन दृष्टिकोन, कृतीत आणता येतील अशा कल्पना आणि प्रगतीसाठी प्रेरणा मिळावी, हा माझा प्रयत्न असतो.

Pages

© 2026 Created with techsavvyamruta