आत्मपरीक्षण: घाण्याला जुंपलेल्या बैलासारखं फिरणं थांबवून प्रगतीकडे नेणारा मार्ग

दिवसभर खूप धावपळ करून, थकून-भागून जेव्हा तुम्ही रात्री अंथरुणावर पडता, तेव्हा ‘आज नक्की काय साध्य केलं?’ हा प्रश्न तुम्हाला शांत झोपू देतो की अस्वस्थ करतो?
जर तुमचं उत्तर ‘अस्वस्थ करतो’ असेल, तर समजून जा की तुम्ही तुमचं आयुष्य ‘ऑटो-पायलट’ मोडवर जगत आहात. आपण धावतोय तर खूप, पण नक्की कुठे पोहोचतोय हेच आपण विसरलो आहोत.
आज आपण एका अशा सवयीबद्दल बोलणार आहोत जी तुमचा माइंडसेट पूर्णपणे बदलू शकते: जाणीवपूर्वक केलेले आत्मपरीक्षण (Conscious Self-Reflection).

१. ‘व्यस्त’ असणं म्हणजे ‘प्रगती’ नव्हे! :
आपल्याला वाटतं की आपण खूप काम करतोय म्हणजे आपण यशस्वी होतोय. पण “व्यस्त असणं म्हणजे प्रगती नाही, तर जाणीवपूर्वक सुधारणा म्हणजे प्रगती आहे”. जेव्हा आपण स्वतःच्या वागण्याकडे लक्ष देत नाही, तेव्हा आपण त्याच चुका वारंवार करत राहतो. सॉक्रेटसने म्हटलं होतं, “जर आयुष्याचं विश्लेषण केलं जात नाही, तर ते जगण्यात काहीच अर्थ नाही”.

२. रागावर नियंत्रण:
बऱ्याचदा आपल्याला प्रत्येक गोष्टीत स्वतःला ‘जस्टिफाय’ करायची सवय असते. कोणी काही बोललं की आपण लगेच चिडतो किंवा प्रतिक्रिया देतो. पण जेव्हा तुम्ही आत्मपरीक्षण करायला लागता, तेव्हा छोटे छोटे बदल दिसायला लागतात.
उदाहरण: एखाद्या दिवशी कोणीतरी तुम्हाला काहीतरी बोललं, आणि नेहमीप्रमाणे चिडण्याऐवजी तुम्ही एक क्षण थांबलात, दीर्घ श्वास (Deep Breathing) घेतला आणि तुमची प्रतिक्रिया थांबवली. हा छोटासा बदल म्हणजे तुमची खरी प्रगती आहे.

३. स्वतःचं कौतुक करायला शिका:
आपल्या आजूबाजूला टीका करणारे खूप असतात, पण कौतुक करणारे कमी. एक खूप छान उदाहरण म्हणजे जेव्हा एक ट्रेनिंग घेतली, तेव्हा त्यांनी एक ॲक्टिव्हिटी दिली: “मला स्वतःचा अभिमान आहे कारण…” अशा २५ गोष्टी लिहिणे. सुरुवातीला कठीण वाटलं, पण जेव्हा या गोष्टी लिहिल्या, तेव्हा त्या पूर्ण ऊर्जा बदलली. जेव्हा आपण स्वतःमधील चांगल्या गोष्टी शोधतो, तेव्हा आपला आत्मविश्वास वाढतो आणि आपण योग्य दिशेने पाऊल टाकत आहोत याची खात्री पटते.

४. दररोज स्वतःला हे प्रश्न विचारा:
दिवस संपण्यापूर्वी किंवा सकाळी उठल्यावर स्वतःला हे साधे प्रश्न विचारण्याची सवय लावा:
आज मी कालपेक्षा कुठे चांगला होतो? (निर्णयात, शिस्तीत की संयमात?)
आज अशी कोणती गोष्ट घडली ज्यातून मला सगळ्यात जास्त समाधान किंवा शिकवण मिळाली?
आज मी वेळेचं नियोजन नीट केलं का?

लक्षात ठेवा: जो माणूस रोज स्वतःच स्वतःला चेक करतो, तोच रोज थोडा थोडा घडत असतो. जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्याची ‘ओनरशिप’ घेता, तेव्हा तुमची प्रगती कोणीच थांबवू शकत नाही.

आज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःबद्दलची अशी एक गोष्ट डायरीत लिहा किंवा खाली कमेंट्समध्ये सांगा, ज्याचा तुम्हाला अभिमान वाटतो. हा छोटासा प्रश्न तुम्हाला एक दिवस खूप मोठं बनवेल!

Amruta More

Software Engineer
Co-Founder of Shashwatswarajya
Director of OPRA IT Solutions Pvt.Ltd

उद्योजकता, तंत्रज्ञान, नेतृत्व, सेल्फ डेव्हलपमेंट आणि आयुष्यात सकारात्मक बदल घडवणाऱ्या विषयांवर मी नियमितपणे लिहिते. माझ्या लेखांमधून तुम्हाला नवीन दृष्टिकोन, कृतीत आणता येतील अशा कल्पना आणि प्रगतीसाठी प्रेरणा मिळावी, हा माझा प्रयत्न असतो.

Edit Template

About

उद्योजकता, तंत्रज्ञान, नेतृत्व, सेल्फ डेव्हलपमेंट आणि आयुष्यात सकारात्मक बदल घडवणाऱ्या विषयांवर मी नियमितपणे लिहिते. माझ्या लेखांमधून तुम्हाला नवीन दृष्टिकोन, कृतीत आणता येतील अशा कल्पना आणि प्रगतीसाठी प्रेरणा मिळावी, हा माझा प्रयत्न असतो.

Pages

© 2026 Created with techsavvyamruta