“When Sleeping Women Wake, Mountains Move :जेव्हा आपण स्वतःची खरी ताकद ओळखतो! “

“तुम्ही शांत आहात म्हणून लोक तुम्हाला कमकुवत समजतात…?
पण एक दिवस तुम्ही स्वतःसाठी उभे राहता… आणि अचानक सगळ्यांची वागणूक बदलते!”
हे फक्त एखाद्या चित्रपटात घडत नाही…हे आपल्या आजूबाजूला नेहमी घडत असतं.
एका Chinese proverb मध्ये म्हटलं आहे:
“When sleeping women wake, mountains move.”
हे फक्त महिलांपुरते मर्यादित नाही.
हा संदेश प्रत्येक त्या व्यक्तीसाठी आहे ज्यांनी स्वतःची खरी ताकद अजून ओळखलेली नाही.
या proverb चा अर्थ असा आहे, जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःची खरी ताकद, क्षमता ओळखते… तेव्हा ती अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही बदलू शकते.

खरं सांगायचं तर…
लोक आपल्याला तसं पाहतात, जसं आपण स्वतःला दाखवतो. कधी कधी आपण इतके adjust करत राहतो, इतके शांत राहतो, की लोकांना वाटू लागतं की आपल्याला काही फरकच पडत नाही.
पण जेव्हा एखादी व्यक्ती आपले inner potential जाणून घेते, स्वतःच्या value ची जाणीव करून घेते… तेव्हा तिचं चालणं, बोलणं, निर्णय घेणं… सगळंच बदलतं.
आणि त्याहून मोठी गोष्ट म्हणजे…लोकांचं perception पण बदलतं.
एका ऑफिसमधले साधे उदाहरण बघा.
एका team मध्ये एक मुलगी होती.
ती खूप मेहनत करायची, पण meetings मध्ये फार बोलत नसे. त्यामुळे तिच्या ideas कडे फारसं लक्ष दिलं जात नव्हतं.
एक दिवस तिने स्वतःचा project confidently present केला. Data, preparation आणि clarity इतकी strong होती की तिचे presentation बघून सगळे शांत झाले.
त्या एका presentation नंतर तिच्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला. हे फक्त corporate मध्ये नाही होत. घरात, business मध्ये, relationships मध्ये… सगळीकडे होतं.
जेव्हा तुम्ही स्वतःला कमी समजता, तेव्हा जगही तसंच वागायला लागतं. पण जेव्हा तुम्ही स्वतःची किंमत ओळखता… तेव्हा परिस्थिती हळूहळू बदलायला लागते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे confidence हा आवाज चढवून दाखवायचा प्रकार नाही. तो action मधून दिसतो.
तुम्ही स्वतःसाठी boundaries set करता…
तुम्ही “नाही” म्हणायला शिकता…
तुम्ही स्वतःच्या growth ला priority देता…तेव्हा लोकांना समजायला लागतं की ही व्यक्ती आता जुनी राहिलेली नाही.

आज social media वर आपण अनेक transformation stories पाहतो.
एका साध्या घरातून आलेली मुलगी स्वतःचा business उभा करते…कोणी 40 व्या वर्षी नवीन career सुरू करतो…कोणी toxic environment सोडून स्वतःची identity तयार करतो…
या फक्त success stories नसतात. या“awakening stories” असतात. कारण खरी क्रांती बाहेर नाही…ती आधी मनात सुरू होते. म्हणून स्वतःला एक प्रश्न विचारा:
“मी अजूनही माझी खरी क्षमता झोपेत ठेवली आहे का?”
कारण एकदा तुम्ही जागे झालात…तर फक्त तुमचं आयुष्य नाही बदलणार…तुमच्यामुळे इतरांनाही स्वतःवर विश्वास ठेवण्याची प्रेरणा मिळेल.

-अमृता मोरे

Amruta More

Software Engineer
Co-Founder of Shashwatswarajya
Director of OPRA IT Solutions Pvt.Ltd

उद्योजकता, तंत्रज्ञान, नेतृत्व, सेल्फ डेव्हलपमेंट आणि आयुष्यात सकारात्मक बदल घडवणाऱ्या विषयांवर मी नियमितपणे लिहिते. माझ्या लेखांमधून तुम्हाला नवीन दृष्टिकोन, कृतीत आणता येतील अशा कल्पना आणि प्रगतीसाठी प्रेरणा मिळावी, हा माझा प्रयत्न असतो.

Edit Template

About

उद्योजकता, तंत्रज्ञान, नेतृत्व, सेल्फ डेव्हलपमेंट आणि आयुष्यात सकारात्मक बदल घडवणाऱ्या विषयांवर मी नियमितपणे लिहिते. माझ्या लेखांमधून तुम्हाला नवीन दृष्टिकोन, कृतीत आणता येतील अशा कल्पना आणि प्रगतीसाठी प्रेरणा मिळावी, हा माझा प्रयत्न असतो.

Pages

© 2026 Created with techsavvyamruta