आशीर्वादाची जादू… तुम्हाला आशीर्वादाची जादू माहित आहे का?


कधी विचार केलाय का की, जेव्हा कोणी आपल्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देतं, तेव्हा नक्की काय होतं? ते फक्त काही शब्द नसून तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारी एक प्रचंड मोठी शक्ती असते!

आशीर्वाद म्हणजे नक्की काय?
सोप्या भाषेत सांगायचं तर, आशीर्वाद हा एक ‘एनर्जी एक्सचेंज’ (Energy Exchange) आहे. जेव्हा आपण कोणाच्या पाया पडतो आणि ते आपल्या डोक्यावर हात ठेवतात, तेव्हा एक कमालीचा ‘एनर्जी सर्किट’ तयार होतो. ही ऊर्जा इतकी शक्तिशाली असते की ती तुमची ‘रियालिटी’ (Reality) आणि तुमचे आयुष्य बदलू शकते. हे सर्व ‘मॅजिकल’ आहे, कारण जिथे लॉजिक संपतं, तिथे ही अदृश्य शक्ती काम करायला लागते. जेव्हा तुमची सर्व कामं अडकलेली असतात, तेव्हा या उर्जेमुळे तुम्ही त्यातून बाहेर कसे पडता, हे तुम्हालाही कळणार नाही. एवढी शक्ती आहे आशीर्वादामध्ये….

आपण स्वतःला दोष देण्यात (Self-blame) तर खूप पटाईत असतो; काही चुकलं की लगेच स्वतःला ओरडतो. पण कधी तुम्ही स्वतःला मनापासून आशीर्वाद दिला आहे का? हे ऐकायला थोडं वेगळं वाटत असेल, पण हे तुमच्या कर्माचं चक्र बदलण्याची ताकद ठेवतं.

तुम्ही म्हणाल स्वतःला आशीर्वाद कसा द्यायचा?
स्वतःला आशीर्वाद देण्याची सोपी पद्धत बघूया:
यासाठी कोणतही कठीण शास्त्र शिकण्याची गरज नाही. हा एक छोटासा अनुभव आहे जो आपण आता घेऊ शकतो:
१. फक्त २० सेकंदांसाठी तुमचे डोळे मिटा.
२. तुमचा उजवा हात तुमच्या हृदयावर ठेवा.
३. स्वतःला मनापासून सांगा – नेहमी आनंदी राहा. तुझ्या आयुष्यात प्रेम, आनंद आणि समृद्धी सतत वाढत राहो. आजचा दिवस तुझ्यासाठी नवीन आशा आणि सुंदर संधी घेऊन येवो. तुझे सर्व अडकलेले आणि राहिलेले काम मार्गी लागत आहे. तू खूप प्रगती कर आणि यशाचं मोठं शिखर गाठ. आणि लक्षात ठेव, कधीच घाबरू नकोस, देवाची कृपा आणि universe ची positive energy नेहमी तुझ्यासोबत आहे.

हा प्रयोग केल्यावर तुम्हाला आतून एक वेगळीच शांतता आणि सकारात्मकता जाणवेल. त्यामुळे उद्यापासून रोज सकाळी उठल्या उठल्या स्वतःला हा आशीर्वाद देण्याची सवय लावा.
जेव्हा तुम्ही स्वतःचे सर्वात मोठे पाठीराखे बनता, तेव्हा संपूर्ण जग तुम्हाला साथ द्यायला उभं राहतं.

हा छोटासा प्रयोग केल्यावर तुम्हाला कसं वाटलं? तुमच्या मनात नेमक्या कोणत्या भावना आल्या? मला कमेंट्समध्ये नक्की सांगा!
-अमृता मोरे

Amruta More

Software Engineer
Co-Founder of Shashwatswarajya
Director of OPRA IT Solutions Pvt.Ltd

उद्योजकता, तंत्रज्ञान, नेतृत्व, सेल्फ डेव्हलपमेंट आणि आयुष्यात सकारात्मक बदल घडवणाऱ्या विषयांवर मी नियमितपणे लिहिते. माझ्या लेखांमधून तुम्हाला नवीन दृष्टिकोन, कृतीत आणता येतील अशा कल्पना आणि प्रगतीसाठी प्रेरणा मिळावी, हा माझा प्रयत्न असतो.

Edit Template

About

उद्योजकता, तंत्रज्ञान, नेतृत्व, सेल्फ डेव्हलपमेंट आणि आयुष्यात सकारात्मक बदल घडवणाऱ्या विषयांवर मी नियमितपणे लिहिते. माझ्या लेखांमधून तुम्हाला नवीन दृष्टिकोन, कृतीत आणता येतील अशा कल्पना आणि प्रगतीसाठी प्रेरणा मिळावी, हा माझा प्रयत्न असतो.

Pages

© 2026 Created with techsavvyamruta