“प्रयत्न खूप करतोय पण परिस्थिती साथ देत नाही “

कधी कधी माणूस परिस्थितीमुळे हताश होतो…
सध्या अनेक लोक अशा परिस्थितून जात आहेत जिथे काम आहे, पण पैसे अडकले आहेत…
क्लायंट येतात, पण deal होत नाही…जबाबदाऱ्या वाढत आहेत…
घर, मुलं, आई-वडील, EMI, शाळेच्या फी, आजारपण…आणि या सगळ्यात स्वतःचं मन कुठेतरी हरवत चाललेलं असतं.
बाहेरून तो माणूस सामान्य दिसतो…पण आतून तो रोज थोडा थोडा तुटत असतो.
अशा वेळी अनेकांना वाटतं “कदाचित माझे प्रयत्न चुकीचे आहेत…”
“मी कमी पडतोय…”
“माझं नशीबच खराब आहे…”
पण सत्य वेगळं असतं. सगळं आपल्या मनासारखे झालं नाही म्हणून आपण हरलो असं नसतं.
कधी कधी काळ कठीण असतो. कधी परिस्थिती आपली परीक्षा घेत असते.
आणि कधी अशा परिस्थिती आपल्याला स्ट्रॉंग बनवत असतात.
लक्षात ठेवा:

  • मानसिक थकवा ही कमजोरी नाही
  • जबाबदाऱ्या सांभाळताना मन थकणं स्वाभाविक आहे
  • मेहनत केल्यावर लगेच results मिळत नाहीत.
  • आणि कठीण काळ म्हणजे अपयश नसतं.

या काळात स्वतःला दोष देऊ नका. स्वतःशी कठोर वागू नका, तर प्रामाणिक आणि संयमी राहा.
थोडं थांबा, शांत व्हा आणि स्वतःलाही समजून घ्या.
पण फक्त स्वतःला समजून घेतल्याने मार्ग निघत नाही…योग्य मार्गावर चालण्याची शक्ती मात्र नक्की मिळते.
अशा काळात फक्त “Positive राहा” म्हणून प्रश्न सुटत नाहीत. आणि फक्त धावपळ करूनही उत्तर मिळत नाही.
त्यासाठी काही गोष्टी जाणीवपूर्वक कराव्या लागतात –

  • सर्व समस्या एकाच वेळी सोडवण्याचा प्रयत्न थांबवा
  • कोणत्या गोष्टी तातडीच्या आहेत ते लिहून काढा
  • आर्थिक परिस्थिती स्पष्टपणे मांडून आवश्यक तिथेच खर्च करा
  • मदत मागायला कमीपणा वाटू देऊ नका
  • शरीर आणि झोप याकडे दुर्लक्ष करू नका
  • दिवसातून थोडा वेळ शांत विचारासाठी ठेवा
  • आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला अपयशी समजणं थांबवा

अनेकदा समस्या इतक्या वाढतात की माणूस “विचार” जास्त करतो आणि “निर्णय” कमी घेतो.
म्हणून…
मन शांत करणं हे महत्वाचे आहे, ती योग्य कृतीची सुरुवात आहे.

शिवाजी महाराजांनीही प्रत्येक संकटात प्रथम परिस्थिती समजून घेतली…
मग योग्य लोक, योग्य योजना आणि योग्य वेळ यांचा उपयोग करून मार्ग काढला.
जीवनातही तेच लागू होतं.

घाबरून घेतलेले निर्णय आयुष्य गुंतवतात. शांत मनाने घेतलेले निर्णय मार्ग दाखवतात.
म्हणून… स्वतःला समजून घ्या. परिस्थिती स्वीकारा. प्राधान्य ठरवा. आणि एकावेळी एक पाऊल टाका.
मार्ग हळूहळू दिसायला लागेल.

-अमृता मोरे

Amruta More

Software Engineer
Co-Founder of Shashwatswarajya
Director of OPRA IT Solutions Pvt.Ltd

उद्योजकता, तंत्रज्ञान, नेतृत्व, सेल्फ डेव्हलपमेंट आणि आयुष्यात सकारात्मक बदल घडवणाऱ्या विषयांवर मी नियमितपणे लिहिते. माझ्या लेखांमधून तुम्हाला नवीन दृष्टिकोन, कृतीत आणता येतील अशा कल्पना आणि प्रगतीसाठी प्रेरणा मिळावी, हा माझा प्रयत्न असतो.

Edit Template

About

उद्योजकता, तंत्रज्ञान, नेतृत्व, सेल्फ डेव्हलपमेंट आणि आयुष्यात सकारात्मक बदल घडवणाऱ्या विषयांवर मी नियमितपणे लिहिते. माझ्या लेखांमधून तुम्हाला नवीन दृष्टिकोन, कृतीत आणता येतील अशा कल्पना आणि प्रगतीसाठी प्रेरणा मिळावी, हा माझा प्रयत्न असतो.

Pages

© 2026 Created with techsavvyamruta