Social Media वर “Limerence Trap” या विषयावर एक लेख वाचला.
ही टर्म माझ्यासाठीही नवीन होती. म्हणून उत्सुकतेपोटी मी यावर थोडा अधिक अभ्यास केला. यावरील माहिती वाचल्यानंतर मला जाणवलं की ही संकल्पना आजच्या काळात अनेकांच्या आयुष्याशी संबंधित आहे. म्हणूनच आज या लेखातून मी याविषयी मला जे समजलं, ते तुमच्यासोबत अगदी सोप्या भाषेत शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे. कदाचित हा लेख वाचताना तुम्हाला स्वतःबद्दल, किंवा तुमच्या आसपासच्या एखाद्या व्यक्तीबद्दलही काही गोष्टी नव्याने जाणवतील.
विशेष म्हणजे, “Limerence” ही सोशल मीडियावर नुकतीच आलेली एखादी फॅन्सी टर्म नाही. १९७९ मध्ये अमेरिकन मानसशास्त्रज्ञ Dorothy Tennov यांनी आपल्या Love and Limerence या पुस्तकातून ही संकल्पना जगासमोर मांडली.
मात्र आजच्या Social Media, WhatsApp, Instagram आणि Online Dating च्या युगात हा विषय पुन्हा मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला आहे. कारण आज अनेकांच्या भावना आणि मानसिक शांतता नकळत दुसऱ्या व्यक्तीच्या Reply, Story View किंवा Online Status वर अवलंबून राहू लागली आहे.
नेमकं Limerence Trap म्हणजे काय?
सकाळी उठल्यावर सर्वात पहिला विचार कोणाचा येतो? मोबाईल हातात घेताच WhatsApp उघडता…
– Online आहे का?
– Instagram वर Story पाहता…
– माझी Story पाहिली का?
– Message ला दोन तास Reply नाही आला की मनात story सुरू होते…कदाचित आता त्याला/तिला माझ्यात Interest नाही.
– मी काहीतरी चुकीचं बोललो का?
आणि अचानक रात्री Message येतो…“Sorry, मी दिवसभर Meeting मध्ये होतो.”
हे सगळं ओळखीचं वाटतंय?
जर होय… तर हे प्रेम असेलच असं नाही. हा Limerence Trap असू शकतो.
Limerence म्हणजे नेमकं काय?
Limerence म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल इतकं तीव्र आकर्षण निर्माण होणं की आपल्या भावना, विचार आणि आनंद याचा कंट्रोल त्या व्यक्तीच्या वागण्यावर अवलंबून राहू लागतो. ती व्यक्ती हसली तर दिवस छान जातो. Reply दिला नाही तर पूर्ण दिवस खराब जातो. आपण त्या व्यक्तीवर प्रेमापेक्षा… त्या व्यक्तीकडून मिळणाऱ्या स्वीकाराच्या अपेक्षेवर प्रेम करू लागतो.
आता आपण एक प्रसंग बघूया –
रोहित एका Client सोबत काम करत होता. पहिल्या दोन मीटिंग खूप छान झाल्या. त्यानंतर Client चे Messages कमी झाले. रोहितच्या मनात विचार सुरू झाले…
“बहुतेक Proposal आवडलं नाही.”
“तो दुसऱ्या कंपनीकडे गेला असेल.”
“माझ्याकडून चूक झाली.”
दोन दिवसांनी Client चा फोन येतो.“Sorry, मी Family Emergency मध्ये होतो.”
दोन दिवस रोहितला ज्या गोष्टींनी त्रास दिला… त्या अस्तित्वातच नव्हत्या. हे फक्त Business मध्येच नाही… Relationship मध्ये, Friendship मध्ये, अगदी Social Media वरसुद्धा असंच घडतं.
Social Media ने हा Trap आणखी वाढवला आहे
“त्याने माझी Story पाहिली.”
“माझ्या पोस्टला Like नाही केला.”
“Online असूनही Reply नाही.”
आज अनेक लोक वास्तवापेक्षा Notification मध्ये जास्त जगत आहेत. आपलं Emotional Health आता दुसऱ्याच्या Screen Time वर अवलंबून आहे.
प्रेम आणि Limerence यात फरक काय?
प्रेम म्हणतं…
“तू आनंदी असलास तर मलाही आनंद आहे.”
Limerence म्हणतं…
“तू मला Reply दिलास तरच मी आनंदी आहे.”
प्रेमात विश्वास असतो.
Limerence मध्ये सतत असुरक्षितता असते.
प्रेम आपल्याला शांत करतं.
Limerence आपल्याला थकवतं.
सर्वात मोठा तोटा कोणता?
Limerence मध्ये आपण त्या व्यक्तीला गमावत नाही… आपण स्वतःला गमावू लागतो. कामात लक्ष लागत नाही. व्यवसाय मागे पडतो. अभ्यासात मन लागत नाही. स्वतःची किंमत आपण दुसऱ्याच्या वागण्यावर ठरवू लागतो. हीच खरी Trap आहे.
यातून बाहेर कसं पडायचं?
सर्वप्रथम स्वतःला एक प्रश्न विचारा…
“मी त्या व्यक्तीवर प्रेम करतोय… की त्या व्यक्तीकडून मिळणाऱ्या Approval वर?” हा प्रश्न अनेक गोष्टी स्पष्ट करतो.
त्यानंतर…
– स्वतःच्या ध्येयांवर पुन्हा लक्ष केंद्रित करा.
– प्रत्येक Notification ला भावनिक अर्थ देणं थांबवा.
– स्वतःचं आयुष्य इतकं समृद्ध करा की तुमचा आनंद एका व्यक्तीवर अवलंबून राहणार नाही.
– लक्षात ठेवा, प्रत्येक शांतता म्हणजे नकार नसतो आणि प्रत्येक उशिरा आलेला Reply म्हणजे दुर्लक्ष नसतं.
स्वतःवर प्रेम करणारी व्यक्ती नातेसंबंध अधिक निरोगी ठेवते. कारण ती दुसऱ्याकडून सतत Validation मागत नाही. ती स्वतःची किंमत स्वतः ठरवते. जर तुमचा आनंद, आत्मविश्वास आणि मनःशांती एखाद्या व्यक्तीच्या Reply, Call किंवा Attention वर अवलंबून असेल, तर थांबा… आणि स्वतःला एकदा नक्की विचारा. मी खरंच त्या व्यक्तीवर प्रेम करतोय… की माझं मन Limerence Trap मध्ये अडकत चाललं आहे? हा एक प्रश्न तुम्हाला वेगळ्या नजरेने पाहायला शिकवू शकतो.
जर हा लेख तुम्हाला उपयुक्त वाटला असेल, तर तो अशा व्यक्तीला नक्की Share करा जी कदाचित नकळत Limerence Trap मध्ये अडकली असेल. कदाचित तुमच्या एका Share मुळे कोणाला स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत होईल.
– अमृता मोरे


