माझ्या आयुष्याची ‘पायलट’ मीच!
४:३० च्या शिस्तीने दिलेली एक वेगळी ओळख
तुम्ही तुमच्या आयुष्याचे हिरो आहात की केवळ एक ‘साईड-कॅरेक्टर’?
या प्रश्नाने मला विचार करायला भाग पाडले. आपण अनेकदा प्रवाहाबरोबर वाहत जातो, पण आपल्या आयुष्याची सूत्रे आपल्या हातात असणे किती महत्त्वाचे आहे, याचा अनुभव मला नुकताच आला.
जेव्हा मी ‘मॉर्निंग रिचुअल’ बद्दल लोकांना सांगते की, मी रोज सकाळी ४:३० वाजता rituals चालू करते, ४.५६ ला आम्ही महाराजांची आरती करतो आणि दिवसाचे नियोजन करतो, तेव्हा सर्वांना हे अनबिलिव्हेबल वाटते. ही केवळ शिस्त नाही, तर आम्ही निर्माण केलेली एक वेगळी ओळख आहे.
“10 हॅबिट्स दॅट विल रिवायर युअर माइंडसेट” या पुस्तकामध्ये सांगितले आहे त्याप्रमाणे, दिवसाच्या सुरुवातीला आपल्या मनात एक ‘स्पेस’ निर्माण करणे आवश्यक असते. सकाळी लवकर उठल्यामुळे विचार करायला वेळ मिळतो आणि दिवसाचे planning करू शकतो. याच वेळेत आम्ही आत्मपरीक्षण करतो आणि Top 3 Priorities ठरवतो. यामुळे कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत आणि कोणत्या सवयी लावायच्या आहेत, याची clarity मिळते.
मूडवर depend राहू नका.
आधी मी म्हणायचे, “मला वाचनाची खूप आवड आहे,” पण मी त्यासाठी वेळ कधीच ब्लॉक केला नव्हता. पण आता केला आहे. आता मी शिकले आहे की, जेव्हा आपल्याकडे clear प्लॅन असतो, तेव्हा आपण मूडवर अवलंबून राहत नाही. मूड चांगला असो वा नसो, मी माझ्या निर्णयावर ठाम राहते. यामुळे माझा आत्मविश्वास वाढला आहे आणि मला Self-control असल्याचे समाधान मिळते.
आयुष्याचा ‘इंचार्ज’ बना.
जर तुम्ही तुमच्या दिवसाचे नियोजन केले नाही, तर दुसरे कोणीतरी ते करेल. मी आता हे अनुभवतेय की, मी फक्त कामाचे नियोजन करत नाही, तर माझा पूर्ण प्लॅन तयार करून दिवस start करते. आज मला हे अभिमानाने सांगता येते की, मी माझ्या वेळेची ‘इंचार्ज’ आहे. वेळ माझ्याकडून काही करून घेत नाही, तर मी माझ्या वेळेप्रमाणे सगळे करते.
स्वतःच्या आयुष्यात केवळ एक ‘साईड-कॅरेक्टर’ बनून राहू नका; ‘हिरो’ म्हणून जगायला सुरुवात करा!
आज झोपण्यापूर्वी उद्याचा clear plan तयार करा आणि पहाटेच्या त्या शांत वेळे मध्ये स्वतःची एक नवी, शिस्तप्रिय ओळख निर्माण करा.
जर तुम्हाला clarity, discipline आणि growth हवी असेल,
तर रोजच्या rituals मध्ये सहभागी व्हा.
https://chat.whatsapp.com/KqCgPZzskA8KGlsWqWvG3M



